शेतीमध्ये वैज्ञानिक आधुनिकता यायला हवी- शरद पवार
29 December 17:58

शेतीमध्ये वैज्ञानिक आधुनिकता यायला हवी- शरद पवार


शेतीमध्ये वैज्ञानिक आधुनिकता यायला हवी- शरद पवार

कृषिकिंग, मुंबई: येत्या काळात विज्ञानाच्या आधारे शेतीत आधुनिकता यायला हवी. जेनेरिक फूड मुळे उत्पादन वाढले, कमी पाण्यातही उत्पादन होत आहे. इंडोनेशियामध्ये कमी पाण्यात ऊस उगवला जातो. या तंत्रज्ञानाचा वापर शेती विषयक समस्या सोडवण्यासाठी झाला पाहिजे. असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सांगितले आहे.

चौथ्या रयत विज्ञान परिषदेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. एकेकाळी आयात करणारा देश म्हणून असलेली भारताची ओळख सध्या निर्यात करणारा देश अशी झाली आहे. असेही पवार यावेळी म्हणाले आहे.

बियाणांमध्ये जनुकीय बदल करून रोगप्रतिकारक, उत्पन्नवाढ करणाऱ्या, कमी पाण्यावरही तग धरणाऱ्या पिकांच्या जाती विकसित व्हायला हव्यात. त्यांच्या ट्रायल्स घेऊन, फायदे-तोटे अभ्यासून या तंत्राचा अवलंब करायला हवा. असेही पवार यांनी यावेळी सांगितले आहे.संबंधित बातम्या