फडणवीस सरकार ब्रिटिश मनोवृत्तीचं; धनंजय मुंडेंची जहरी टीका
27 December 12:19

फडणवीस सरकार ब्रिटिश मनोवृत्तीचं; धनंजय मुंडेंची जहरी टीका


फडणवीस सरकार ब्रिटिश मनोवृत्तीचं; धनंजय मुंडेंची जहरी टीका

कृषिकिंग, मुंबई: शेतकरी धर्मा पाटील यांच्या वयोवृद्ध पत्नी आणि मुलाला प्रतिबंधात्मक कारवाईच्या नावाखाली ताब्यात घेण्यात आलं होतं. विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारच्या या कारवाईचा निषेध यांनी केला आहे. फडणवीस सरकार हे ब्रिटिश मनोवृत्तीचे असल्याची टीका मुंडे यांनी केली आहे.

धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन फडणवीस सरकारवर जहरी टीका केली. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात अडथळा नको म्हणून मंत्रालयात आत्महत्या करणाऱ्या धर्मा पाटील यांच्या वयोवृद्ध पत्नी आणि मुलाला अटक करणे म्हणजे फडणवीस सरकारची ब्रिटिश मनोवृत्ती दाखवून देते. सरकारच्या कृतीचा जाहीर निषेध, असे ट्विट मुंडे यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धुळे दौऱ्यावर येणार असल्याने दोंडाईचा पोलिसांनी मंत्रालयात विषप्राशन करुन आत्महत्या करणाऱ्या विखरण ता.शिंदखेडा येथील शेतकरी धर्मा पाटील यांच्या पत्नी सखुबाई धर्मा पाटील आणि मुलगा नरेंद्र धर्मा पाटील यांना काल(बुधवारी) प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून सकाळी सहा वाजेपासून विखरण येथून आणून पोलीस स्टेशनला बसवून ठेवले होते.संबंधित बातम्या