सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेसाठी १०० कोटींचा निधी देणार- मुख्यमंत्री
27 December 11:22

सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेसाठी १०० कोटींचा निधी देणार- मुख्यमंत्री


सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेसाठी १०० कोटींचा निधी देणार- मुख्यमंत्री

कृषिकिंग, धुळे: "धुळे जिल्ह्यासाठी नवसंजीवनी ठरणाऱ्या सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेचा बळीराजा जलसंजीवनी योजनेत समावेश करण्यात आला असून, या योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे याकरिता भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. याकरिता केंद्र शासनाकडून ५६ कोटी तर राज्य शासनाचा ४४ कोटी रुपयांचा हिस्सा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येईल," असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

धुळे जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेली बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, वैद्यकीय शिक्षण व जलसंपदामंत्री गिरीष महाजन, रोजगार हमी योजना व पर्यटनमंत्री जयकुमार रावल, ग्रामविकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री दादा भुसे हेही उपस्थित होते.संबंधित बातम्या