सदाभाऊ खोत यांच्या गाडीसमोर टोमॅटो फेकून निषेध
26 December 16:40

सदाभाऊ खोत यांच्या गाडीसमोर टोमॅटो फेकून निषेध


सदाभाऊ खोत यांच्या गाडीसमोर टोमॅटो फेकून निषेध

कृषिकिंग, परभणी: दुष्काळी परिस्थितीमध्ये टोमॅटोला किरकोळ भाव मिळत असल्याने आणि शासनाच्या उपाययोजना ठप्प असल्याने आज (बुधवारी) कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीसमोर टोमॅटो फेकून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदवला. शहरातील बसस्थानकाजवळील उड्डाणपूल भागात दुपारी साधारणत ३ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासाठी खोत परभणीला आले होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर खोत यांच्या वाहनांचा ताफा स्टेशन रोड, बसस्थानक मार्गाने पाथरीकडे निघाला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, दिगंबर पवार, केशव आरमळ आदींसह इतर कार्यकर्ते उड्डाणपुलाजवळ सुरुवातीपासूनच थांबले होते. यावेळी पोलीस बंदोबस्तही होता. याच परिस्थितीत खोत यांच्या वाहनांचा ताफा पुढे निघून गेला.संबंधित बातम्या