धर्मा पाटलांची पत्नी व मुलगा पोलिसांच्या ताब्यात; वाचा काय आहे बातमी
26 December 16:04

धर्मा पाटलांची पत्नी व मुलगा पोलिसांच्या ताब्यात; वाचा काय आहे बातमी


धर्मा पाटलांची पत्नी व मुलगा पोलिसांच्या ताब्यात; वाचा काय आहे बातमी

कृषिकिंग, धुळे: मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या केलेल्या शेतकरी धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नावाखाली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. दोंडाईचा पोलिस स्टेशनमध्ये पाटील यांच्या पत्नी आणि मुलाला प्रतिबंधात्मक कारवाईच्या नावाखाली ठेवण्यात आलं आहे.

धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपरिषदेच्या इमारतीचे उदघाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे. याशिवाय दादासाहेब रावल मैदानात ते शेतकरी मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहे. मुख्यमंत्र्यांचा दौरा झाल्यानंतर त्यांना सोडण्यात येणार आहे. धर्मा पाटील यांनी या वर्षी २२ जानेवारीला मंत्रालयात विषप्राशन केले होते. एक आठवड्यानंतर सेंट जॉर्ज रुग्णालयात त्यांचे निधन झाले होते.

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील विखरण गावात धर्मा पाटील यांचे कुटुंबीय राहतात. राज्य सरकारने औष्णिक वीज प्रकल्पासाठी शिंदखेडा येथील शेतजमिनीचे भूसंपादन सुरु केले. यात धर्मा पाटील यांची पाच एकर जमीन संपादित झाली. पाटील यांच्या शेतात ६०० आंब्याची झाडे लावली होती. तसेच बोअरवेल, विहीर देखील होती. प्रकल्पासाठी दिलेल्या जमिनीच्या चार पट मोबदला देण्याचे सरकारी धोरण असताना पाटील यांना फक्त ४ लाख ३ हजार रुपये इतकाच मोबदला मिळाला. तर लगतच्या शेतमालकांना जवळपास दीड कोटी रुपयांचा मोबदला मिळाला, असा पाटील कुटुंबीयांचा आरोप आहे.संबंधित बातम्या