मध्यप्रदेशात लवकरच २५ हजार टन युरिया उपलब्ध होईल- कमलनाथ
25 December 18:35

मध्यप्रदेशात लवकरच २५ हजार टन युरिया उपलब्ध होईल- कमलनाथ


मध्यप्रदेशात लवकरच २५ हजार टन युरिया उपलब्ध होईल- कमलनाथ

कृषिकिंग, भोपाळ: सध्या राजस्थान आणि मध्यप्रदेशात मोठं युरिया संकट निर्माण झालं आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केंद्रीय खते व रसायन मंत्रालयासोबत तात्काळ युरिया पुरवठा करण्याची मागणी केली आहे.

कमलनाथ यांच्या या मागणीला केंद्र खते व रसायने मंत्रालयाने तात्काळ मंजुरी देत २५ हजार टन युरियाची पूर्तता करण्यास सहमती दर्शवली आहे. याशिवाय कमलनाथ यांनी केंद्र सरकारला पुढील ७ दिवसांत १० युरिया रॅक (रेल्वे) प्राधान्याने पाठवण्याची मागणी केली आहे.

राज्यातील युरिया संकट पाहून कमलनाथ यांनी काल(मंगळवारी) ट्विट करत शेतकऱ्यांना भरोसा दिला होता. की, "शेतकऱ्यांना लवकरच युरिया उपलब्ध करून दिला जाईल." त्यानुषंगाने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतर आता मध्यप्रदेशला २५ हजार टन युरिया उपलब्ध होणार आहे.

दरम्यान, सध्यस्थितीत मध्यप्रदेश राजस्थान मध्ये युरियाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना मोठ-मोठ्या रांगेत थांबूनही हवा त्या प्रमाणात युरिया मिळत नाहीये.संबंधित बातम्या