राजस्थानातील युरिया संकटाला केंद्र सरकार जबाबदार- अशोक गहलोत
25 December 11:50

राजस्थानातील युरिया संकटाला केंद्र सरकार जबाबदार- अशोक गहलोत


राजस्थानातील युरिया संकटाला केंद्र सरकार जबाबदार- अशोक गहलोत

कृषिकिंग, जयपूर: राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राज्यातील युरिया संकटाला केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. केंद्र सरकारने मध्यप्रदेश आणि राजस्थानला मिळणारा युरिया हरियाणाकडे वळवला आहे. ज्यामुळे राजस्थानात ऐन हंगामात युरिया संकट झाले आहे. असा आरोप मुख्यमंत्री गहलोत यांनी केला आहे.

राजस्थान आणि मध्यप्रदेशात सत्ता परिवर्तन झाल्याने केंद्र सरकारकडून जाणूनबुजून टंचाई निर्माण करण्याचे काम केले जात आहे. मात्र, यासंदर्भात चौकशी केली जाईल. तसेच अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहे की, राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात युरियाचा तुटवडा जाणवता कामा नये. याशिवाय पंतप्रधान मोदी यांच्या पोलीस बंदोबस्तात राजस्थानात युरिया वितरण सुरु असल्याच्या टीकेबाबत बोलताना त्यांनी सांगितले आहे की, भाजप सरकारच्या काळातही पोलीस बंदोबस्तात युरिया वितरण सुरु होते.संबंधित बातम्या