राजस्थानात युरियासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष; चढ्या दराने खरेदी करण्यास मजबूर
25 December 08:30

राजस्थानात युरियासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष; चढ्या दराने खरेदी करण्यास मजबूर

राजस्थानात युरियासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष; चढ्या दराने खरेदी करण्यास मजबूर

कृषिकिंग, जयपूर: राजस्थानात गहू पेरणीला महिना झाल्याने शेतकरी गव्हाला पाणी तर देत आहे. मात्र, युरियासाठी त्यांना दुकानांचे चक्कर मारावे लागत आहे. युरियाचा पुरवठा कमी होत असल्याने दुकानदारही त्याचा फायदा घेत आहेत. अनेक दुकानदार राजस्थानात २७० रुपयांची युरियाची गोणी ३३०-४३० रुपयांना विक्री करत आहेत. अर्थात युरियाच्या गोणीसाठी शेतकऱ्यांना निर्धारित भावापेक्षा ६० ते १६० रुपये अधिक मोजावे लागत आहे.

याच पार्श्वभूमीवर राजस्थानातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांना युरिया मिळवण्यासाठी तासनतास रांगेत थांबावं लागत आहे. तर अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्तात युरियाची विक्री केली जात आहे.टॅग्स

संबंधित बातम्या