चालू आर्थिक वर्षात ४२ लाख टन युरिया आयात
22 December 16:51

चालू आर्थिक वर्षात ४२ लाख टन युरिया आयात


चालू आर्थिक वर्षात ४२ लाख टन युरिया आयात

कृषिकिंग, नवी दिल्ली: "भारताची चालू आर्थिक वर्षातील युरिया आयात नोव्हेंबर अखेरपर्यंत ४२.०३ लाख टनांवर पोचली आहे. या आयातीचा खर्च १ अब्ज डॉलरहून अधिक झाला आहे," अशी माहिती केंद्र सरकारकडून लोकसभेत देण्यात आली आहे.

लोकसभेत लेखी उत्तरात रसायने व खते राज्यमंत्री राव इंद्रजीत सिंह यांनी सांगितले आहे की, "सर्व खतांमध्ये केवळ युरियाच्या किंमतीवर सरकार नियंत्रण ठेवण्यात येते. याचबरोबर राज्य सरकारांच्या मालकीच्या कंपन्यांमार्फत युरियाची थेट आयात करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ओमानमधून २० लाख टन युरिया आयात केला जात आहे. इफको आणि कृभको या कंपन्यांमार्फत ही आयात करण्यात येत आहे. चालू आर्थिक वर्षात नोव्हेंबर अखेरपर्यंत ४२.०३ लाख टन युरियाची आयात करण्यात आली आहे. ही आयात एकूण १ हजार ४८ दशलक्ष डॉलरची आहे."टॅग्स

संबंधित बातम्या