महत्त्वाची बातमी: झारखंड सरकार शेतकऱ्यांना एकरी ५ हजार रुपये देणार
22 December 11:18

महत्त्वाची बातमी: झारखंड सरकार शेतकऱ्यांना एकरी ५ हजार रुपये देणार


महत्त्वाची बातमी: झारखंड सरकार शेतकऱ्यांना एकरी ५ हजार रुपये देणार

कृषिकिंग, रांची(झारखंड): झारखंड सरकारने शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार शेतकऱ्यांना दरवर्षी प्रति एकरावर पाच हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम मिळणार आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. 'मुख्यमंत्री आशीर्वाद योजना' असे या योजनेचे नाव आहे. यामध्ये जास्तीत जास्त ५ एकर पर्यंत शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे. या योजने अंतर्गत झारखंडमधील एकूण २२ लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी पत्रकार परिषदेत ही माहीती दिली आहे.

दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१९-२० पासून झारखंड सरकार शेतकऱ्यांना ५ हजार रुपये प्रति एकर खरीप पिकांसाठी प्रोत्साहन भत्ता देणार आहे. एक एकर पेक्षा कमी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना देखील ५ हजार रुपये दिले जातील. शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न वाढण्यासाठी राज्य सरकार २ हजार २५० कोटी रक्कम खर्च करणार आहे.

२०१९-२० च्या अर्थसंकल्पात ही योजना आणणार असल्याचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी सांगितले. त्यामुळे आता शेतकऱ्यांना वीज, खते, बियाणे आणि इतर शेती गुंतवणूकीसाठी बॅंकवर अवलंबून राहण्याची गरज लागणार नाही. शेतीसाठी त्यांना कर्ज घ्यावे लागणार नाही. ही योजना पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी असेल.



संबंधित बातम्या