अवकाळी पाऊस व गारपिटीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ११ कोटी
19 December 12:52

अवकाळी पाऊस व गारपिटीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ११ कोटी


अवकाळी पाऊस व गारपिटीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ११ कोटी

कृषिकिंग, पुणे: राज्यात एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना ११ कोटी ७ लाख ९९ हजार १९५ रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील १७ हजार १७१ शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. एप्रिल आणि मे या महिन्यात मिळून राज्यातील ६ हजार ८३८ हेक्टर आणि ३९ एकर क्षेत्र बाधित झाले होते. त्याचा फटका १७ हजार १७८ शेतकऱ्यांना बसला होता. त्या पोटी ११ कोटी ७ लाख ९९ हजार १९५ रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

राज्यात एप्रिल आणि मे २०१८ या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर फळभाज्या आणि फळ पिकांचे नुकसान झाले होते. एप्रिल महिन्यात राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने दाणादाण उडविली. या महिन्यात राज्यातील ५ हजार ९३ हेक्टर ६५ एकर क्षेत्र बाधित झाले होते. त्याचा १२ हजार ७२६ शेतकऱ्यांना फटका बसला. त्यातही मराठवाड्यातील औरंगाबाद विभागात सर्वाधिक हानी झाली. औरंगाबाद विभागातील २ हजार १२० हेक्टर क्षेत्र बाधित झाले. त्या खालोखाल पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पुणे विभागातील ८५९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते

मे महिन्यात राज्यातील १३ जिल्ह्यांना अवकाळीचा फटका बसला होता. पुणे, नाशिक, अमरावती आणि औरंगाबाद विभागात अवकाळीने नुकसान झाले होते. राज्यातील १ हजार ७४० हेक्टर ७४ एकर क्षेत्र बाधित झाले होते. त्यात पुणे विभागाला सर्वाधिक १ हजार २४१ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली होते.संबंधित बातम्या