विदर्भात पाऊस; तर मध्य महाराष्ट्रात थंडीचे साम्राज्य
18 December 11:17

विदर्भात पाऊस; तर मध्य महाराष्ट्रात थंडीचे साम्राज्य


विदर्भात पाऊस; तर मध्य महाराष्ट्रात थंडीचे साम्राज्य

कृषिकिंग, पुणे: बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘पेथाई’ च्रकीवादळाच्या प्रभावामुळे विदर्भ, मराठवाड्यात ढग जमा झाले आहे. काल (सोमवारी) पूर्व विदर्भात पावसाच्या सरींनी हजेरी लावली, तर उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह वाढल्याने मध्य महाराष्ट्राला थंडी वाढली आहे. दरम्यान, विदर्भात आजही (मंगळवार) ढगाळ हवामानाचा अंदाज आहे.

‘पेथाई’ चक्रीवादळाने बाष्प खेचून आणल्याने पूर्व विदर्भात पावसाला सुरवात झाली होती. भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलक्या सरी कोसळत होत्या. सातत्याने पडणाऱ्या भिज पावसामुळे वाढीच्या अवस्थेतील रब्बी पिकांना लाभ होणार आहे. तर यवतमाळ, वर्धा, अमरावती, अकोला, वाशीम, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात ढगाळ हवामान होते.

वादळाची तीव्रता ओसरत असली तरीही, आज आंध्र प्रदेश, ओडिशा, छत्तीसगडमध्ये पावसाची शक्यता आहे. तर आसाम, मेघालयासह ईशान्य भारतातील राज्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.टॅग्स

संबंधित बातम्या