'पेथाई' चक्रीवादळ धडकणार; पूर्व किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता
17 December 11:01

'पेथाई' चक्रीवादळ धडकणार; पूर्व किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता


'पेथाई' चक्रीवादळ धडकणार; पूर्व किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता

कृषिकिंग, पुणे: बंगालच्या उपसागरात घोंगावत असलेल्या ‘पेथाई’ चक्रीवादळाची तीव्रता वाढत आहे. आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूच्या किनाऱ्याकडे झेपावणारे चक्रीवादळ आज (१७ डिसेंबर) आंध्रप्रदेशच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. पूर्व किनारपट्टीवर जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

`पेथाईप’ चक्रीवादळाचे केंद्र चेन्नईपासून पूर्वेकडेकडे ४३० किलोमीटर, आंध्र प्रदेशातील मच्छलीपट्टणमपासून ५६० किलोमीटर दक्षिणेकडे समुद्रात आहे. आज त्याचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असून, दुपारनंतर ते मच्छलीपट्टणम आणि काकीनाडाच्या आसपास जमिनीवर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या प्रणालीमुळे पूर्व किनारपट्टीवर जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागांत ढगाळ हवामान होण्याची शक्यता आहे. पावसाला पोषक हवामान, उत्तरेकडून येणारे थंड वारे यामुळे राज्यातील तापमानात चढ-उतार होत आहेत.टॅग्स

संबंधित बातम्या