उत्तर भारतीय राज्यांमध्ये पावसाची शक्यता; गहू पिकाला फायदा
12 December 18:47

उत्तर भारतीय राज्यांमध्ये पावसाची शक्यता; गहू पिकाला फायदा


उत्तर भारतीय राज्यांमध्ये पावसाची शक्यता; गहू पिकाला फायदा

कृषिकिंग, नवी दिल्ली: उत्तर भारतीय राज्यांमध्ये येत्या २४ तासांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय उत्तर भारतीय पहाडी राज्यांमध्ये विशेषतः जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये पावसासह बर्फ पडण्याची शक्यता आहे. असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) व्यक्त केला आहे.

दरम्यान, "संपूर्ण उत्तर भारतासह पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये थंडी वाढण्याची शक्यता आहे. असे हवामान विभागाने सांगितले आहे, त्यामुळे या थंडीचा उत्तर भारतातील गहू पिकाला फुटव्यासाठी मोठा फायदा होणार आहे. पुढे जाऊन असेच हवामान राहिले तर गहू उत्पादन वाढीसाठी याचा विशेष फायदा होईल." असे हरियाणाच्या करनाल येथील गहू संशोधन केंद्राचे संचालक डॉ.जी.पी.सिंह यांनी सांगितले आहे.टॅग्स

संबंधित बातम्या