नाशिक जिल्ह्यातील ओझर येथे शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारलं जाणार
10 December 14:45

नाशिक जिल्ह्यातील ओझर येथे शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारलं जाणार


नाशिक जिल्ह्यातील ओझर येथे शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारलं जाणार

कृषिकिंग, नाशिक: नाशिकच्या निफाड तालुक्यातील ओझर येथे ५९ लाख ७० हजार रुपये खर्च करून पहिलं शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेने ई-निविदा प्रसिद्ध केली असून, नावीन्यपूर्ण कामातून हे शेतकरी केंद्र उभारले जाणार आहे. या शेतकरी प्रशिक्षण केंद्रात शेतकऱ्यांसाठी काय सुविधा असतील याची माहिती अद्याप दिलेली नसली तरी हे केंद्र शेतकऱ्यांना खूप उपयोगी ठरणार आहे.

शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी सरकारने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हे प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे. शेतकऱ्यांना शेतीविषयी शास्त्रीय माहिती देण्यापासून अनेक योजना त्यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी शेतकरी केंद्र आवश्यक आहे. त्यातून बाजारभाव, शाश्वत शेती, आधुनिक शेती यासारख्या अनेक गोष्टी माहित असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे खते, जमिनीचा पोत, हवामान, आधुनिक तंत्राचा वापर याची माहिती सुद्धा या केंद्रातून शेतकऱ्यांपर्यंत जाणे आवश्यक आहे.टॅग्स

संबंधित बातम्या