विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता
10 December 11:11

विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता


विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता

कृषिकिंग, पुणे: विदर्भात वादळी वारे, विजांसह, हलका पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानासह तापमानात चढ-उतार होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे.

पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भात ढगाळ हवामान आहे. दोन दिवसांच्या ढगाळी वातावरणानंतर रविवारी (९ डिसेंबर) सकाळी विदर्भातील नागपूर, यवतमाळ व भंडारा जिल्ह्यासह इतरही काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे तूर पिकासह कापसाला फटका बसला आहे. दोन आठवड्यांपासून राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावल्यानंतर आता विदर्भातही पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

पूर्वेकडून वाहत असणाऱ्या वाऱ्यांमुळे मध्य महाराष्ट्रात हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. बंगालच्या उपसागरावरून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने पूर्व विदर्भासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये ढग जमा झाले आहेत.संबंधित बातम्या