दुष्काळात ज्वारीचं शेत फुलवलं; वादळी वाऱ्याने भुईसपाट केलं
10 December 10:41

दुष्काळात ज्वारीचं शेत फुलवलं; वादळी वाऱ्याने भुईसपाट केलं


दुष्काळात ज्वारीचं शेत फुलवलं; वादळी वाऱ्याने भुईसपाट केलं

कृषिकिंग, सेलू(परभणी): दुष्काळी परिस्थितीमुळे यावर्षी खरीप पिकांच्या उत्पन्नात कमालीची घट झाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडलाय. रब्बी हंगामात झालेल्या थोड्या फार पेरण्यावर शेतकऱ्यांनी कष्ट घेतले. मात्र, त्यावरही निसर्गाची अवकृपा झाल्याचे समोर आले आहे. परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील हातनूर येथील शेतकरी अशोक शेषराव नागटिळे यांची दीड एकर ज्वारी शनिवारी (८ डिसेंबर) दूपारी चारच्या सुमारास झालेल्या वादळी वार्‍याने भूईसपाट झाली आहे.

शेतकरी नागटिळे यांनी आपल्या दोन एक्कर शेतात रब्बीच्या ज्वारी पिकाची पेरणी केली. थोड्याफार ओलीवर केलेली ज्वारी तर्राट वाढली. पोटर्‍यात आलेल्या ज्वारीला परिसरातील रान डूकरे, निलगायी पासून बचाव करण्यासाठी या शेतकर्‍याने कमालीचे कष्ट करून चौहू बाजूने घरातील साड्या बांधून कुंपण घातले. ज्वारीला येत्या आठ दिवसात कणशेही लागणार होते. त्यातच निसर्गाच्या अवकृपेने शनिवारी जोराचा वादळी वारा आला अन् दोन एक्कर ज्वारीतील दिड एक्कर ज्वारी बघता बघता भूईसपाट झाली.

एकीकडे दुष्काळाचं भीषण वास्तव. अशा परिस्थितीतही शेतकरी नागटिळे यांनी मोठ्या अपेक्षेनं ज्वारीचं शेत फुलवलं. मात्र, ऐन हाता तोंडांशी पीक आलं असतानाच होत्याच नव्हतं झालं. काय म्हणावं या नियतीला.टॅग्स

संबंधित बातम्या