शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून राज्यकर्ते निवडणुकांमध्ये गुंतलेत- उद्धव ठाकरे
07 December 11:55

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून राज्यकर्ते निवडणुकांमध्ये गुंतलेत- उद्धव ठाकरे


शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून राज्यकर्ते निवडणुकांमध्ये गुंतलेत- उद्धव ठाकरे

कृषिकिंग, मुंबई: शेतकरी प्रश्नावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ‘जवान’ आणि ‘किसान’ यांना वार्‍यावर सोडून पालिकांपासून विधानसभा निवडणुकांपर्यंत आमचे राज्यकर्ते गुंतले आहेत. अशा शब्दांत सामनाच्या संपादकीयमधून उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला आहे.

संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ चार-पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक प्रचारात गुंतले आहे. पण महाराष्ट्र राज्य मात्र दुष्काळाच्या वणव्यात होरपळत आहे. मुख्यमंत्री स्वतः धुळे महापालिका प्रचारात व्यग्र आहेत. राज्याच्या इतर मंत्र्यांनाही धुळे महापालिकेचे प्रभाग नेमून दिले आहेत. देशाचे संरक्षण राज्यमंत्री असलेले सुभाष भामरेही सध्या धुळ्यातच मुक्कामी आहेत. यावरुन उद्धव ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

''फडणवीस सरकारने दुष्काळग्रस्तांसाठी प्रचंड घोषणाबाजी केली, पण शेतकरी मरणपंथाला लागला आहे. सध्या केंद्रीय दुष्काळ पथक राजाच्या दुष्काळी दौर्‍यावर आले आहे. या पथकाला महाराष्ट्रात ‘बॉडीगार्ड’ घेऊन फिरावे लागले. किसन वारे आणि संजय साठे हा काट्यावरचा प्रवास आहे. ज्या वाटेवरून सरकार आले त्याच वाटेवर आता सुरुंग पेरले आहेत'', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला आहे.संबंधित बातम्या