प्यायला पाणी न्हाय...जनावरांना चारा न्हाय...लोकं गाव सोडून चालल्याती
06 December 18:11

प्यायला पाणी न्हाय...जनावरांना चारा न्हाय...लोकं गाव सोडून चालल्याती


प्यायला पाणी न्हाय...जनावरांना चारा न्हाय...लोकं गाव सोडून चालल्याती

कृषिकिंग, सांगली: दोन वर्षापासून पाऊस न्हाय...चारा न्हाय...प्यायला पाणी न्हाय....शेतात पेरल्यालं उगवलं न्हाय... पिक वीमा मिळाला न्हाय...हाताला काम नसल्यानं गावातील लोकं गाव सोडून चालल्याती बघा असं गाऱ्हाणं आटपाडी तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रिय पथकाकडे मांडलं आहे.

या केंद्रीय पथकामध्ये निती आयोगाचे सहसंचालक सुभाषचंद्र मीना, एम. जी. टेंभूर्णे, चाऱ्याचे विशेष तज्ज्ञ विजय ठाकरे यांचा समावेश आहे. या पथकाने आज (गुरुवारी) आटपाडी तालुक्‍यातील पात्रेवाडी, लेंगरेवाडी, मानेवाडी, माडगुळे, मुढेवाडी आणि निंबवडे या गावातील जळालेले पिक, कोरड्या विहिरींची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी शेतकऱ्यांना आपल्या व्यथा मांडल्या आहेत.

यावेळी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील, खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर, विभागीय आयुक्त दिपक म्हैसकर, महसूलचे उपायुक्त प्रताप जाधव, कृषी आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, कृषी अधिक्षक अधिकारी राजेंद्र साबळे यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.संबंधित बातम्या