कोल्हापूर जिल्ह्याला पावसानं झोडपलं; थंडी गायब
06 December 17:10

कोल्हापूर जिल्ह्याला पावसानं झोडपलं; थंडी गायब


कोल्हापूर जिल्ह्याला पावसानं झोडपलं; थंडी गायब

कृषिकिंग, कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात गुरुवारी दुपारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. पारगड भागात सुमारे तासभर झालेल्या या पावसामुळे आठवडी बाजारात पाणी शिरलंय. ढगाळ वातावरणामुळे राज्याच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली असल्यामुळे थंडीचा जोर कमी झाला आहे. तर मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पाऊस झाल्याचीही माहिती आहे.

राज्यातील बहुतांश ठिकाणी गेल्या पाच-सहा दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे हे ढग जमा झाले आहेत. दक्षिण कर्नाटक आणि परिसरावर असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती, आणि पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात हलके ढग स्थिरावले आहेत. यामुळे राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. दरम्यान, येत्या २४ तासात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे.

विषुववृत्ताजवळील हिंदी महासागर आणि दक्षिण बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं आहे. त्यातच पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचे प्रवाहदेखील सक्रिय असल्याने पुणे वेधशाळेनं कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता २४ तासांपूर्वी वर्तवली होती.



टॅग्स

संबंधित बातम्या