पंजाब सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्याचे प्रति क्विंटल २५ रुपये भरणार- सिंह
07 December 08:30

पंजाब सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्याचे प्रति क्विंटल २५ रुपये भरणार- सिंह

पंजाब सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्याचे प्रति क्विंटल २५ रुपये भरणार- सिंह

कृषिकिंग, चंदिगढ(पंजाब): थकबाकी आणि यावर्षीच्या गाळपाला उशीर झाल्याने नाराज असलेल्या पंजाबच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पंजाब सरकारने दिलासा दिला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २५ रुपये सरकारकडून दिले जाणार आहे. असे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी जाहीर केले आहे.

पंजाब सरकारकडून राज्य समर्थन मूल्याच्या ३१० रुपये प्रति क्विंटल या रकमेतील २५ रुपये प्रति क्विंटलने असेल ती रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. तर उर्वरित २८५ रुपये (प्रति क्विंटल) रक्कम साखर कारखान्यांना शेतकऱ्यांना द्यावी लागणार आहे. सिंह यांनी खासगी साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर केला आहे.संबंधित बातम्या