कांदा निर्यात अनुदान १० टक्के करण्याची मागणी
06 December 15:13

कांदा निर्यात अनुदान १० टक्के करण्याची मागणी


कांदा निर्यात अनुदान १० टक्के करण्याची मागणी

कृषिकिंग, मुंबई: "कांद्याचे उतरलेले भाव सावरण्यासाठी निर्यात अनुदान ५ टक्क्यावरुन १० टक्के करणे, तसेच निर्यात शुल्क शून्य टक्क्यांवर कायम राखणे आदी उपाययोजना करण्याविषयी केंद्र शासनाकडे मागणी करण्यात येणार आहे. राज्य शासन कांदा उत्पादकांना योग्य बाजारभाव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे," असे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले आहे.

कांद्याचे बाजारभाव, निर्यातीबाबतची सद्यस्थिती तसेच नाशिक विभागातील कांदाचाळ योजनेचा आढावा घेण्यासाठी खोत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्या दरम्यान झालेल्या चर्चेनंतर त्यांनी ही माहिती दिली आहे. कृषी व पणन विभागाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

देशांतर्गत विक्रीसाठी वाहतुकीच्या अनुषंगाने वाहतूक अनुदानाची योजना सुरू आहे. त्यात शेतकरी उत्पादक कंपनी, शेतमाल सहकारी संस्था, शेतकरी गटांना पणन मंडळामार्फत मदत करण्यात येत आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.संबंधित बातम्या