छावण्या नसतील तर जनावरं पाहुण्यांकडे नेऊन सोडा; राम शिंदेंचं संतापजनक वक्तव्य
06 December 14:29

छावण्या नसतील तर जनावरं पाहुण्यांकडे नेऊन सोडा; राम शिंदेंचं संतापजनक वक्तव्य


छावण्या नसतील तर जनावरं पाहुण्यांकडे नेऊन सोडा; राम शिंदेंचं संतापजनक वक्तव्य

कृषिकिंग, अहमदनगर: दुष्काळामुळं जनता हवालदिल झालेली असतानाच अहमदनगरचे पालकमंत्री व राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी संतापजनक वक्तव्य केलं आहे. चारा छावण्यांबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना त्यांनी छावण्या नसतील तर जनावरं द्या पाहुण्यांकडे धाडून असं संतापजनक उत्तर दिलं आहे.

पाथर्डी पालिकेच्या हद्दीत येणाऱ्या गावांमध्ये दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चारा छावण्या आणि रोजगार हमीची कामे सुरु करण्यात यावीत. या मागणीसाठी नगरसेवक रमेश गोळे यांनी आमदार मोनिका राजळे आणि राम शिंदे यांना निवेदन दिले. त्यावेळी त्यांनी हे संतापजनक वक्तव्य केलं आहे.

पाथर्डी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा पाहणी दौरा करण्यासाठी आलेल्या पथकाच्या स्वागतासाठी ते विश्रामगृहात थांबले होते. त्यावेळी हा सर्व प्रकार घडला. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यांच्या या वक्तव्यावर सर्व स्तरातून नाराजी व्यक्त होत आहे.संबंधित बातम्या