हंगामपूर्व द्राक्षांना मिळतोय १०० रुपये प्रति किलोचा भाव
06 December 12:46

हंगामपूर्व द्राक्षांना मिळतोय १०० रुपये प्रति किलोचा भाव


हंगामपूर्व द्राक्षांना मिळतोय १०० रुपये प्रति किलोचा भाव

कृषिकिंग, नाशिक: राज्यभर दुष्काळाचे चटके बसत आहे. त्यातच कांदा, टोमॅटो व अन्य भाजीपाला पिकांचा उत्पादन खर्च मिळणेही अवघड झाले आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यातील कसमादे पट्टय़ात हंगामपूर्व (अर्ली) द्राक्षांना प्रारंभीच सरासरी १०० रुपये भाव मिळाल्याने उत्पादकांना सुखद धक्का बसला आहे. रशिया, बांग्लादेश, पश्चिम बंगालमधून या द्राक्षांना मागणी आहे.

बागलाण (सटाणा) तालुक्यात थॉमसन, क्लोन दोन या वाणाची द्राक्षे प्रति किलो सरासरी ११० रुपये किलो दराने खरेदी केली जात आहे. यावर्षीच्या हंगामात शेतकरी प्रदीप देवरे यांच्या बागेतील द्राक्षे पहिल्यांदा बाजारात गेली. एक एकरच्या द्राक्ष बागेतून सात टन उत्पादन झाले. त्यातून त्यांना सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. हंगामपूर्व द्राक्षांना महिनाभरात ११० ते ८० रुपये किलोदरम्यान भाव मिळाला आहे.

संपूर्ण जिल्ह्य़ात पाणीटंचाईचे सावट असून उन्हाळ्यात त्याची झळ द्राक्षबागांनाही बसू शकते. वातावरण पोषक राहिल्याने यावर्षी मुबलक उत्पादन होईल; परंतु निर्यात उंचावेल की नाही, याबद्दल साशंकता आहे. जानेवारी महिन्यात निफाडसह अन्य भागातील द्राक्षे बाजारात आल्यानंतर दर काही अंशी कमी होतील. असे जाणकारांकडून सांगितले जात आहे.टॅग्स

संबंधित बातम्या