साडे चार वर्षात ४४ हजार १४२ हजार कोटींच्या तेलबिया-डाळींची खरेदी- कृषी मंत्रालय
06 December 11:51

साडे चार वर्षात ४४ हजार १४२ हजार कोटींच्या तेलबिया-डाळींची खरेदी- कृषी मंत्रालय


साडे चार वर्षात ४४ हजार १४२ हजार कोटींच्या तेलबिया-डाळींची खरेदी- कृषी मंत्रालय

कृषिकिंग, नवी दिल्ली: २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तसेच उत्पादन-उत्पादकता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने विशेष भर दिला आहे. त्याच अनुषंगाने सरकारने गेल्या साडे चार वर्षात ४४ हजार १४२ हजार कोटी रकमेच्या तेलबिया-डाळींची खरेदी केली आहे. २००९-१४ या कालावधीच्या तुलनेत २०१४ पासून आतापर्यंत डाळींच्या व तेलबियांच्या खरेदीत १३ पटीने वाढ झाली आहे. त्याचा ५४ लाख शेतकऱ्यांना थेट फायदा झाला आहे. असे केंद्रीय कृषी मंत्रालयाने म्हटले आहे.

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २००९-१० यावर्षी १४.६६ मिलियन टन डाळींचे उत्पादन झाले होते. तर २०१७-१८ मध्ये तेच २५.२३ मिलियन टनांपर्यंत वाढले आहे. याप्रमाणे डाळींच्या उत्पादनात ७२.१० टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचप्रमाणे २०१७-१८ यावर्षी ३१.३ मिलियन टन तेलबियांचे उत्पादन नोंदवले गेले आहे. जे २००९-१० मध्ये २४.८८ लाख टन इतके नोंदवले गेले होते. याप्रमाणे तेलबियांच्या उत्पादनात २५.८० टक्क्यांनी वाढ झाली आहे.टॅग्स

संबंधित बातम्या