शेतकरी कंपन्यांना एमआयडीसीमध्ये जागा मिळणार- सुभाष देसाई
06 December 10:42

शेतकरी कंपन्यांना एमआयडीसीमध्ये जागा मिळणार- सुभाष देसाई


शेतकरी कंपन्यांना एमआयडीसीमध्ये जागा मिळणार- सुभाष देसाई

कृषिकिंग, मुंबई: कृषी औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी उद्योग विभागाच्या वतीने एमआयडीसीमध्ये शेतकरी कंपन्यांना जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मंत्रालयातील दालनात झालेल्या शेतकरी कंपन्यांच्या बैठकीत हा निर्णय़ घेण्यात आला आहे.

शेती उत्पादनाचे क्लस्टर तयार करणे, शेतीच्या मूल्यवर्धनासाठी प्राथमिक सुविधा उभारणे, वेअर हाऊसिंग आदी प्रकल्पांसाठी पीकनिहाय सामुदायिक सुविधा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामध्ये (एमआयडीसी) जागा मिळावी, अशी मागणी यावेळी शेतकरी कंपन्यांच्या प्रतिनिधींनी केली. त्याला उद्योगमंत्री देसाई यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला आहे. एमआयडीसीच्या माध्यमातून कौशल्ये विकासासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असेही देसाई यांनी यावेळी सांगितले आहे.

शेतकरी उत्पादन कंपन्यांचे काम सध्या प्राथमिक स्तरावर सुरू आहे. त्याचा विस्तार करण्यासाठी तसेच सार्वजनिक, खासगी भागिदारीमधून गुंतवणूक वाढवण्याची गरज शेतकरी कंपन्यांच्या प्रतिनिधींनी या बैठकीत व्यक्त केली होती. त्यास देसाई यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.



संबंधित बातम्या