कृषी आणि ग्रामविकासाला 'स्मार्ट' प्रकल्पातून चालना मिळेल- मुख्यमंत्री
06 December 10:37

कृषी आणि ग्रामविकासाला 'स्मार्ट' प्रकल्पातून चालना मिळेल- मुख्यमंत्री


कृषी आणि ग्रामविकासाला 'स्मार्ट' प्रकल्पातून चालना मिळेल- मुख्यमंत्री

कृषिकिंग, मुंबई: शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळावा तसेच शेतकऱ्यांना त्यांची उत्पादने थेट कॉर्पोरेट कंपन्यांना किंवा थेट बाजारात विकता यावीत यासाठी राज्य शासनाने जागतिक बँकेच्या सहाय्याने हाती घेतलेल्या ‘स्मार्ट’ प्रकल्पाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे.

यावेळी राज्य शासन, विविध कॉर्पोरेट कंपन्या, शेतकरी कंपन्या यांच्यामध्ये ४६ सामंजस्य करार करण्यात आले. यामध्ये रिलायन्स रिटेल, ॲमेझॉन, वॉलमार्ट, महिंद्रा ॲग्रो, पेप्सिको, टाटा रॅलीज, बिग बास्केट, पतंजली यांसारख्या नामवंत कंपन्यांबरोबर हे करार करण्यात आले आहे.

प्राथमिक टप्प्यात राज्यातील १० हजार गावांमध्ये 'स्मार्ट' प्रकल्प राबविला जाणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, त्यांच्या मालाला चांगला भाव मिळवून देणे आणि या माध्यमातून कृषी तसेच ग्राम विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने स्मार्ट प्रकल्प क्रांतिकारी ठरेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले आहे.

यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पदुममंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, जागतिक बँकेचे भारतातील प्रमुख जुनैद अहमद, वॉलमार्टचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिश ऐयर आदी उपस्थित होते.संबंधित बातम्या