आर्सेनिकयुक्त मातीत पीक घेण्याबाबत इंग्लडमध्ये संशोधन करताहेत भारतीय शास्रज्ञ
05 December 18:51

आर्सेनिकयुक्त मातीत पीक घेण्याबाबत इंग्लडमध्ये संशोधन करताहेत भारतीय शास्रज्ञ


आर्सेनिकयुक्त मातीत पीक घेण्याबाबत इंग्लडमध्ये संशोधन करताहेत भारतीय शास्रज्ञ

कृषिकिंग, वृत्तसंस्था: इंग्लडमध्ये एक भारतीय शास्रज्ञ आर्सेनिक युक्त मातीमध्ये पीक घेण्याच्या दृष्टीने काम करत आहे. त्यांच्या या संशोधनाचा उत्तर-पूर्व भारतातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

वार्विक विद्यापीठातील स्कूल ऑफ लाइफ साइंसेजच्या डॉ.अलेक्स जोन्स प्रयोगशाळेमध्ये डॉ. मोहन टीसी हे यासंदर्भात ट्रांसजेनिक जौ पिकावर प्रायोगिक तत्वावर परीक्षण करत आहेत. वार्विक विद्यापीठाने आज जागतिक मृदा दिनाच्या (५ डिसेंबर) पार्श्वभूमीवर याबाबत घोषणा केली आहे.

आर्सेनिकमुळे कॅन्सर होत असल्यामुळे खाद्यपदार्थांमध्ये त्याचा प्रवेश होऊ न देणे गरजेचे असते. त्याच अनुषंगाने सुरक्षित पीक उत्पादन घेणे आवश्यक आहे. मातीमध्ये आर्सेनिकचे प्रमाण असणे ही जागतिक समस्या आहे. पूर्वोत्तर भारत आणि बांग्लादेशात मातीमध्ये आर्सेनिकचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून येते. असेही विद्यापीठाने म्हटले आहे.संबंधित बातम्या