रब्बी हंगामासाठी खतांचा पर्याप्त साठा- सदानंद गौडा
05 December 17:08

रब्बी हंगामासाठी खतांचा पर्याप्त साठा- सदानंद गौडा


रब्बी हंगामासाठी खतांचा पर्याप्त साठा- सदानंद गौडा

कृषिकिंग, नवी दिल्ली: "चालू रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खतांची पूर्तता करून देण्यासाठी सरकार पूर्णपणे तयार असून, सर्व राज्यांकडे खतांचा पर्याप्त साठा उपलब्ध आहे." अशी माहिती केंद्रीय खत व रसायने मंत्री डी.वी.सदानंद गौडा यांनी दिली आहे.

याशिवाय देशभरात खतांचे वितरण आणि पुरवठा करण्यासाठी आपलं मंत्रालय रेल्वे मंत्रालयाच्या सतत संपर्कात आहे. मागील खरीप हंगामात रेल्वे मंत्रालयाने देशातील विविध भागांमध्ये खतांचा पुरवठा करण्यासाठी २५० अतिरिक्त रॅक्स उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यामुळे या हंगामातही खतांची पूर्तता करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. असेही त्यांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांना खते खरेदी करताना कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून ५० टक्के साठा आगाऊ पूर्ततेसाठी खुला करण्यात आला आहे. रब्बी हंगामात सर्वाधिक खतांची आवशक्यता ही डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांमध्ये असते. चालू रब्बी हंगामात अंदाजित १५५.८४ लाख टन युरियाची आवश्यकता असणार आहे. ही आवशक्यता १२९ लाख टन या देशातंर्गत उत्पादनातून आणि आयातीच्या माध्यमातून पूर्ण केली जाणार आहे. त्यासाठी आवश्यकतेनुसार २५ लाख टन युरियाची आयात कारण्याची योजना बनवली आहे. अशी माहितीही सदानंद गौडा यांनी यावेळी दिली आहे.टॅग्स

संबंधित बातम्या