पंजाब, हरियाणामधून हमीभावाने २४० लाख टन धानाची खरेदी
06 December 08:30

पंजाब, हरियाणामधून हमीभावाने २४० लाख टन धानाची खरेदी


पंजाब, हरियाणामधून हमीभावाने २४० लाख टन धानाची खरेदी

कृषिकिंग, नवी दिल्ली: २०१८-१९ च्या चालू खरीप हंगामात पंजाब आणि हरियाणा या राज्यांमधून हमीभावाने २४०.७७ लाख टन धानाची खरेदी करण्यात आली आहे. अशी माहिती भारतीय अन्नधान्य महामंडळाकडून (एफसीआय) देण्यात आली आहे.

भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पंजाबमधून चालू हंगामात १७०.१७ लाख टन धानाची खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये १६८.९३ लाख सरकारी एजन्सीजकडून तर १ लाख २४ हजार ३७९ टन धानाची खरेदी ही खासगी तांदूळ मिल्सकडून करण्यात आली आहे. या धान खरेदीसाठी पंजाब सरकारने २४ हजार ०५० कोटी रुपये मंजूर केले आहे.

याशिवाय हरियाणामधून चालू खरीप हंगामात हमीभावाने ७०.६० लाख टन धानाची खरेदी करण्यात आली आहे, ज्यामध्ये ५८.०४ लाख टन सरकारी एजन्सीजकडून तर १२.५५ लाख टन धान खरेदी खासगी तांदूळ मिल्सकडून करण्यात आली आहे.टॅग्स

संबंधित बातम्या