कांदा, टोमॅटोनंतर आता बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळेना
05 December 14:23

कांदा, टोमॅटोनंतर आता बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळेना


कांदा, टोमॅटोनंतर आता बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळेना

कृषिकिंग, नवी दिल्ली: ग्राहक २५ ते ३० रुपये प्रतिकिलो दराने बटाटा खरेदी करत असले तरी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळणेही मुश्कील झाले आहे. दिल्लीच्या आझादपूर बाजार समितीत सध्या नवीन बटाटा ६.५० ते १० रुपये प्रति किलो दराने तर जुना बटाटा २ ते ७ रुपये प्रति किलो इतक्या कमी दराने विकला जात आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागत आहे.

उत्तरप्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातील बटाटा उत्पादक शेतकरी अंबुज शर्मा यांनी सांगितले आहे, "कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलेल्या बटाट्याच्या दरात प्रति किलो २ ते ७ रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. ज्यामुळे वाहतूक खर्च, कोल्ड स्टोरेजच्या खर्चासह उत्पादन खर्चही मिळणे अवघड झाले आहे.

या शेतकऱ्याने पुढे बोलताना सांगितले आहे की, त्यांचा २ एकरातील बटाटा काढणीला आला आहे. मात्र, भाव नसल्याने मोठ्या नुकसान सहन करावे लागत आहे. महिनाभारत बटाटाच्या दरात प्रति क्विंटलमागे ४०० ते ५०० रुपयांनी घसरण झाली आहे.टॅग्स

संबंधित बातम्या