देशातील ४१५ कारखान्यांचे गाळप सुरु; गहू पेरणीला होतोय उशीर
05 December 13:58

देशातील ४१५ कारखान्यांचे गाळप सुरु; गहू पेरणीला होतोय उशीर


देशातील ४१५ कारखान्यांचे गाळप सुरु; गहू पेरणीला होतोय उशीर

कृषिकिंग, पुणे: "१ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या यावर्षीच्या हंगामात देशभरातील ४१५ साखर कारखान्यांनी आपले गाळप सुरु केले आहे. मागील वर्षी याच कालावधीत ४५० कारखान्यांनी आपले गाळप सुरु केले होते." अशी माहिती इंडियन शुगर मिल्स एसोसिएशनने (इस्मा) दिली आहे.

यामध्ये महाराष्ट्रातील १६७ कारखान्यांनी आपले गाळप सुरु केले आहे. या कारखान्यांकडून चालू हंगामात १८.०५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. जे मागील वर्षीच्या याच कालावधीतील उत्पादनाच्या तुलनेत २१ टक्क्यांनी अधिक आहे.

तर उत्तरप्रदेशातील १०९ कारखान्यांनी आपले गाळप सुरु केले आहे. मागील वर्षी याच कालावधीत उत्तरप्रदेशात १२१ कारखान्यांनी आपले गाळप सुरु केले होते. यावर्षीच्या हंगामात उत्तरप्रदेशातील कारखान्यांकडून ९.५० लाख टन साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत १३.११ लाख टन इतके नोंदवले गेले होते. अर्थात उत्तरप्रदेशातील साखर उत्पादनात मागील वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे.

दरम्यान, बऱ्याच कारखान्यांकडून आपले गाळप सुरु न झाल्याने गहू उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे. कारखान्यांकडून गाळप सुरु न झाल्याने वेळेत शेत खाली न होण्याची मुश्किल ओढवली आहे. त्यामुळे वेळेत ऊस तोडणी करून गव्हाची पेरणी करण्यास उशीर होत आहे.टॅग्स

संबंधित बातम्या