राज्यात ढगाळ हवामान, काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता
05 December 12:43

राज्यात ढगाळ हवामान, काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता


राज्यात ढगाळ हवामान, काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता

कृषिकिंग, पुणे: राज्यातील बहुतांश ठिकाणी गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे हे ढग जमा झाले असून, येत्या २४ तासात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे.

दक्षिण कर्नाटक आणि परिसरावर असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती, आणि पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात हलके ढग स्थिरावले आहेत. यामुळे राज्याच्या किमान तापमानात काहीशी वाढ झाली असली तरी तापमान सरासरीच्या जळपास असल्याने थंडी कायम असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.

विषुववृत्ताजवळील हिंदी महासागर आणि दक्षिण बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. तर पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचे प्रवाहदेखील सक्रिय असल्याने दक्षिण भारतात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. ही शक्यता कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सुद्धा निर्माण झाली असून, येत्या २४ तासात या भागांत तुरळक सरी पडू शकतात. असंही वेधशाळेनं म्हटलं आहे.



टॅग्स

संबंधित बातम्या