जमिनीच्या भेगा कशा भरणार...केंद्राचं पाहणी पथक?
05 December 11:53

जमिनीच्या भेगा कशा भरणार...केंद्राचं पाहणी पथक?


जमिनीच्या भेगा कशा भरणार...केंद्राचं पाहणी पथक?

कृषिकिंग, औरंगाबाद: मराठवाड्यातील भीषण दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक आज मराठवाड्यात दाखल होणार आहे. १० जणांची ही टीम मराठवाड्यातील काही गावात आजपासून पुढील तीन दिवस पाहणी कऱणार आहे.

पावसाअभावी शेतीचं नुकसान...पोटच्या लेकरागत जपलेल्या पिकाची झालेली अवस्था...वरूणराजा रुसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय. हे विदारक दृश्यं आहे मराठवाड्यातल्या भीषण दुष्काळाचं... मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झालाय. केंद्र सरकारला ७ हजार कोटींच्या मदतीचा प्रस्तावसुद्धा पाठवण्यात आलाय. याच प्रस्तावाची चाचपणी करण्यासाठी केंद्र सरकारचं पथक आजपासून मराठवाड्यात दुष्काळाची पाहणी करणार आहे.

पावसाची आकडेवारी, पीक परिस्थिती, भूजल पातळी, आर्थिक अवस्था, सुरु असलेल्या उपाययोजना या सगळ्या गोष्टींची चाचपणी हे पथक तीन दिवसांत करणार आहे. यानंतर एक सविस्तर अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात येणार आहे. १० जणांचे हे पथक असून यातून तीन वेगवेगळी पथकं मराठवाड्यातील वेगवेगळ्यात गावात भेटी देणार आहेत.

दरम्यान, केंद्राचं पथक मराठवाड्याला नवीन नाही. आतापर्यंत प्रत्येकच दुष्काळात केंद्राचं पथक पाहणीला आलंय. मात्र त्यानंतरही मिळणाऱ्या मदतीला वर्षभरापेक्षा जास्त काळ लागलाय. मात्र यावर्षीची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे आता सरकारने दुष्काळग्रस्तांना लवकरात लवकर मदत जाहीर करावी. तरच त्यांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळेल.



टॅग्स

संबंधित बातम्या