लाजिरवाणी घटना..; वळुला जीवंत जाळण्याचा प्रयत्न
05 December 11:11

लाजिरवाणी घटना..; वळुला जीवंत जाळण्याचा प्रयत्न


लाजिरवाणी घटना..; वळुला जीवंत जाळण्याचा प्रयत्न

कृषिकिंग, जयपूर: राजस्थानातील जयपूरच्या चौमू या भागात एका वळुला अॅसिड टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. सोशल मिडियावर या घटनेचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. या वळुला बांधून त्याच्या अंगावर अॅसिड टाकण्यात आलं. त्यानंतर त्याला जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला गेल्याचं या व्हीडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. धक्कादायक बाब अशी की, यापूर्वीसुद्धा चौमू मतदारसंघात वळूवर अॅसीड टाकल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.टॅग्स

संबंधित बातम्या