तृणधान्यांच्या उत्पादन वाढीवर भर देण्याची गरज- राज्यपाल
05 December 10:34

तृणधान्यांच्या उत्पादन वाढीवर भर देण्याची गरज- राज्यपाल


तृणधान्यांच्या उत्पादन वाढीवर भर देण्याची गरज- राज्यपाल

कृषिकिंग, मुंबई: आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यासाठी पौष्टिक तृणधान्य आवश्यक आहे. राज्यातील जनतेस तसेच आदिवासी भागातील लोकांना पौष्टिक आहार अधिकाधिक उपलब्ध व्हावा, यादृष्टीने त्यांचे उत्पादन वाढविण्याची गरज असल्याचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी सांगितले आहे. पौष्टिक तृणधान्याबाबतची आढावा बैठक राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते.

"राज्यात पौष्टिक तृणधान्य पिकांचे क्षेत्र, विस्तार, उत्पादन, वृद्धी, पिकाचे पौष्टिक मूल्य शेतकऱ्यापर्यंत पोहचविणे, नवीन वाणांची शेतकऱ्यांना माहिती व्हावी, याकरिता प्रचार व प्रसार करुन त्याचे लागवड क्षेत्र वाढविणे आवश्यक आहे. यासाठी कृषी विद्यापीठे, कृषी विभाग व संबंधित इतर विभागांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आरोग्याबाबतच्या जनजागृतीमूळे ज्वारी, बाजरी व नाचणी या तृणधान्याला अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. या पौष्टिक तृणधान्यामुळे आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे. यासाठी भविष्यात पौष्टिक तृणधान्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होऊन उत्पन्न वाढणे आवश्यक आहे. यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल." असेही राज्यपालांनी यावेळी सांगितले आहे.संबंधित बातम्या