जागतिक मृदा दिन; गरज जमिनीची सुपीकता टिकविण्याची...
05 December 10:18

जागतिक मृदा दिन; गरज जमिनीची सुपीकता टिकविण्याची...


जागतिक मृदा दिन; गरज जमिनीची सुपीकता टिकविण्याची...

कृषिकिंग, पुणे: रासायनिक खतांचा वारेमाप वापर व सेंद्रिय खतांचा अभाव, एकापाठोपाठ एकच पीक घेण्याची पद्धती, दिवसेंदिवस वाढणारी अन्नधान्याची गरज व त्यामुळे शेतीवर पडणारा अतिभार इत्यादी घटकांमुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे. यामुळे पिकांच्या वाढीवर, उत्पादनावर, उत्पादकतेवर आणि गुणवत्तेवर अनिष्ट परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या साधनांचा योग्य वापर करून उत्पादन वाढविणे आणि जमिनीची सुपीकता टिकविण्याकडे भर देणे गरजेचे आहे.

संपूर्ण जगाला पोसण्यासाठी स्वतः आईसमान झिजणाऱ्या या काळ्या आईच्या कुशीत आपण विष न कालवता तिची सुपीकता आबाधित ठेऊन, मानवी आरोग्य उत्तम प्रकारे आनंदित करू, हीच त्या धरित्रीप्रती खरी कृतार्थता ठरेल...संबंधित बातम्या