शेळ्या-मेंढ्यांच्या चारा-पाण्यासाठी पाठपुरावा करणार- खोतकर
04 December 17:09

शेळ्या-मेंढ्यांच्या चारा-पाण्यासाठी पाठपुरावा करणार- खोतकर


शेळ्या-मेंढ्यांच्या चारा-पाण्यासाठी पाठपुरावा करणार- खोतकर

कृषिकिंग, मुंबई: राज्यातील काही भागात दुष्काळाची परिस्थिती उद्भवली आहे. अशा भागात गाई, बैल यासारख्या पशूधनासाठी चारा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था राज्य शासनामार्फत करण्यात येते. याअंतर्गत मेंढी व शेळीसाठी देखील पाणी-चाऱ्याची व्यवस्था व्हावी यासाठी आपण जातीने लक्ष घालून पाठपुरावा करू, असे आश्वासन पशू, दुग्ध आणि मत्स्य विकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिले आहे.

राज्यातील मेंढपाळ करणाऱ्या धनगर समाजातील प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयात राज्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. मेढ्यांवरील रोगाचे निदान करण्यासाठी पुणे येथे प्रयोगशाळा सुरु करावी, तसेच मेंढ्यावरील औषधांच्या किंमती जास्त असल्याने उपचाराचा खर्च वाढतो त्यापेक्षा जेनेरिक औषधी उपलब्ध करून द्यावी. अशा मागण्याही या शिष्टमंडळाने केल्या आहेत. या सर्व मागण्यांसाठी लवकरच बैठक घेऊन समाधान काढण्यात येईल, असे आश्वासन राज्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहे.

धनगर समाजातील मेंढपाळ हा घटक राना वनात भटकंती करुन उदरनिर्वाह करतो. त्यामुळे त्यांच्यावर हल्ला होणे, दरोडे पडणे यासारख्या बाबी घडून येतात. या दरोड्यांची चौकशी व्हावी यासाठीचे निवेदनही शिष्टमंडळाकडून यावेळी देण्यात आले आहे.



संबंधित बातम्या