उद्धव ठाकरे दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करणार
04 December 12:41

उद्धव ठाकरे दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करणार


उद्धव ठाकरे दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करणार

कृषिकिंग, मुंबई: सरकारने दुष्काळग्रस्तांसाठी जाहीर केलेली मदत त्यांना मिळते की नाही? याचा जाब मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचारावा आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी सरकार काय करतेय ते आक्रमकपणे विचारावे, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना मंत्र्यांना दिले आहेत.

तसेच दुष्काळग्रस्त भागाचा आढावा घेऊन मदत करावी, अहवाल द्यावा. शिवसेना मंत्र्यांचा दुष्काळग्रस्त गावांतील आढावा अहवाल आल्यावर उद्धव ठाकरे स्वतः दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर शिवसेना मंत्र्यांची बैठक बोलावली होती. सकाळी मुख्यमंत्र्यांबरोबर एका गाडीतून प्रवास केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी दुष्काळावरून सरकारला जाब विचारण्याचे आदेश दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.संबंधित बातम्या