परभणीत राज्यस्तरीय दुष्काळ शेतकरी मराठी साहित्य संमेलन
04 December 08:30

परभणीत राज्यस्तरीय दुष्काळ शेतकरी मराठी साहित्य संमेलन


परभणीत राज्यस्तरीय दुष्काळ शेतकरी मराठी साहित्य संमेलन

कृषिकिंग, परभणी: परभणी येथे छत्रपती शिवाजीराजे प्रतिष्ठाणतर्फे रविवारी (१६ डिसेंबर) एकदिवसीय राज्यस्तरीय दुष्काळ शेतकरी मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्यात आले आहे. कवी श्रीकांत देशमुख राहेरीकर यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, तर ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. आयोजक तथा स्वागताध्यक्ष अॅड. विष्णू नवले पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

दुष्काळी स्थितीमुळे संकटात सापडलेल्या राज्यातील शेतक-यांच्या समस्यांवर विचारमंथन करून शेती, माती, शेतकरी यांच्या सर्वंकष उत्थानासाठी देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या राज्यस्तरीय दुष्काळ शेतकरी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन परभणी येथील बी. रघुनाथ सभागृहामध्ये करण्यात आले आहे.संबंधित बातम्या