डॉक्टर नव्हे देवदूतच; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांवर मोफत उपचार
03 December 14:25

डॉक्टर नव्हे देवदूतच; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांवर मोफत उपचार


डॉक्टर नव्हे देवदूतच; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांवर मोफत उपचार

कृषिकिंग, बुलडाणा: दुष्काळामुळे शेतकऱ्यांपुढे एक मोठं आर्थिक संकट निर्माण झालं आहे. राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करून थोडासा दिलासा दिला खरा, मात्र उपाययोजनांची अंमलबजावणी कुठेही होताना दिसत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शेतकऱ्यांसमोर दैनंदिन खर्च आणि भौतिक समस्यांचा विळखा कायम आहे. अशातच अनेक मदतीचे हात शेतकऱ्यांसाठी पुढे येत आहे. मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातील डोंगराळ भागातील बनोटी या गावचे डॉक्टर असलेले संजय महाजन हेदेखील यापैकीच एक. महाजन यांनी शेतकऱ्यांना मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे.

दुष्काळामुळे खरिपातील पिके पूर्णतः वाया गेली आहे. रब्बीच्या पिकांची तर बातच नाही. काही ठिकाणी पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकांना जगवलं. मात्र, त्या उत्पादनालाही योग्य तो दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचं आर्थिक गणित पूर्णतः कोलमडून गेलं आहे. त्यामुळे अशा आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये बळीराजाला समाजाचा एक कार्यक्षम घटक म्हणून आधार देणे गरजेचे आहे.संबंधित बातम्या