किसानपुत्र आंदोलनाच्या ६ व्या राज्यस्तरीय शिबिराचे कोल्हापुरात आयोजन
03 December 11:57

किसानपुत्र आंदोलनाच्या ६ व्या राज्यस्तरीय शिबिराचे कोल्हापुरात आयोजन

किसानपुत्र आंदोलनाच्या ६ व्या राज्यस्तरीय शिबिराचे कोल्हापुरात आयोजन

कृषिकिंग, कोल्हापूर: वाढत असलेल्या शेतकरी आत्महत्यांची कारणे व उपाय, शेतकरी विरोधी कायदे यावर चर्चा करण्यासाठी किसानपुत्र आंदोलनाचे सहावे राज्यस्तरीय शिबीर ५ आणि ६ जानेवारीला वारणानगर (कोल्हापूर) येथे होणार आहे.

शेतकऱ्यांच्या गुलामीची कारणे, जमीन अधिग्रहण कायदा, शेतकरी आणि संविधान या विषयांवर या शिबिरात चर्चा होणार आहे. शेतकरीविरोधी कायदे रद्द व्हावेत यासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्यातर्फे किसानपुत्र आंदोलन चालवले जाते. शिबिरात केवळ ७० जनांनाच प्रवेश दिला जाणार आहे. इच्छुकांनी शिबीर संयोजक चिदंबर चांदूरकर- 9922331122 यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.संबंधित बातम्या