दुष्काळी पाहणीसाठी केंद्रीय पथक बुधवारपासून मराठवाडा दौऱ्यावर
03 December 10:25

दुष्काळी पाहणीसाठी केंद्रीय पथक बुधवारपासून मराठवाडा दौऱ्यावर


दुष्काळी पाहणीसाठी केंद्रीय पथक बुधवारपासून मराठवाडा दौऱ्यावर

कृषिकिंग, पुणे: सतत कुठल्या ना कुठल्या संकटांचा सामना करणाऱ्या मराठवाड्यावर यावर्षीही दुष्काळाचे संकट आहे. दुष्काळ निवारणासाठी केंद्राची मदत मिळावी, यासाठी बुधवारपासून (५ डिसेंबरपासून ते ८ डिसेंबरपर्यंत) केंद्रीय पथक मराठवाड्याच्या पाहणी दौऱ्यावर येत आहे.

विभागातील ४४ तालुके गंभीर तर तीन तालुके मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे जाहीर झाले आहे. यापैकी निवडक ठिकाणी ५ ते ७ दिवस भेट देऊन नुकसानीचा आढावा हे पथक घेणार आहे. त्यानंतर हे पथक केंद्र सरकार आपला अहवाल सादर करेल. व केंदाची राज्याला मदत घोषित होईल.

दरम्यान, विभागातील ७६ तालुक्‍यांतील ४२१ पैकी ३४० मंडळांत दुष्काळ घोषित झालेला आहे. मात्र, ८१ मंडळांत अद्यापही दुष्काळ घोषित करण्यात आलेला नाही; तसेच दुष्काळ घोषित झालेल्या गावांमध्ये कुठल्याही उपाययोजना राबविण्यास वेग आलेला नाही. अर्थात दुष्काळ जाहीर झाला. मात्र, अंमलबजावणीच्या नावाने बोंबाबोंब असल्याचंच दिसून येतंय.संबंधित बातम्या