शेतकरी सुखी झाला तर या सरकारचा डीजे लावून सत्कार करीन- विखे पाटील
29 November 12:09

शेतकरी सुखी झाला तर या सरकारचा डीजे लावून सत्कार करीन- विखे पाटील


शेतकरी सुखी झाला तर या सरकारचा डीजे लावून सत्कार करीन- विखे पाटील

कृषिकिंग, मुंबई: राज्यातील लाखो दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित असताना भाजप-शिवसेनेचे सरकार दुष्काळी उपाययोजना सुरू असल्याचे ढोल बडवते आहे. हे वस्तुस्थितीचे "भान' नसलेले "बेभान' सरकार आहे. सरकारने तातडीने प्रभावी व व्यापक उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. शेतकरी सुखी झाला तर मी या सरकारचा डीजे लावून सत्कार करीन, अशी उपहासात्मक टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

विधानसभेमध्ये नियम २९३ अंतर्गत दुष्काळी उपाययोजनांसंदर्भातील चर्चेमध्ये ते बोलत होते. केंद्र व राज्य सरकारच्या कृषिविषयक धोरणांवर कडाडून टीका करताना ते म्हणाले आहे की, राज्य सरकारने जाहीर केलेला दुष्काळ पुरेसा नाही. केंद्र सरकारच्या कठोर निकषांमुळे अनेक दुष्काळी तालुके या यादीतून वगळले गेले. सरकारने दुष्काळ जाहीर केला. मात्र, दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी होताना दिसत नाही.संबंधित बातम्या