सरकारला दुष्काळाचे गांभीर्य नाही; एकनाथ खडसेंचा सरकारला घरचा आहेर
28 November 12:03

सरकारला दुष्काळाचे गांभीर्य नाही; एकनाथ खडसेंचा सरकारला घरचा आहेर


सरकारला दुष्काळाचे गांभीर्य नाही; एकनाथ खडसेंचा सरकारला घरचा आहेर

कृषिकिंग, मुंबई: ‘या सरकारला दुष्काळाचे अजिबात गांभीर्य नाही. पाण्यासाठी माझ्यावर अक्षरश: माझ्याच सरकारकडे भीक मागण्याची वेळ आली आहे,’ अशा शब्दांत माजी मंत्री व आमदार एकनाथ खडसे यांनी भाजप सरकारला घरचा आहेर दिला आहे.

वारंवार पाठपुरावा करूनही दुष्काळी उपाययोजना होत नसतील तर आपल्याला विधानसभेच्या पायऱ्यांवर आपल्याच सरकारविरोधात निदर्शने करण्याची परवानगी द्या, अशी उद्विग्न मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. विधानसभेत सुरू असलेल्या दुष्काळावरील चर्चेदरम्यान त्यांनी ही टीका केली.

दुष्काळी परिस्थितीवरील उपाययोजनांबाबत आपण स्थानिक प्रशासन तसेच सरकारकडेही गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा करत असल्याचे सांगत दुष्काळाबाबत सरकारचा पोरखेळ सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. वीज देयके भरली नसल्याने आपल्या मतदारसंघात १६ वेळा पाणीपुरवठा योजनांची वीज खंडित करण्यात आल्याने पाणीपुरवठ्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे कृषी पंपाच्या धर्तीवर पाणी योजनांची वीज खंडित न करण्याचे धोरण सरकारने राबवावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली आहे. आमच्याच मतदारसंघात जर आमच्यावर तोंड लपवून फिरण्याची वेळ येत असेल तर इतरांचे काय होत असेल, असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.टॅग्स

संबंधित बातम्या