देवा...दुष्काळावर निधी खर्च करण्याची बुद्धी दे- सुप्रिया सुळे
28 November 10:38

देवा...दुष्काळावर निधी खर्च करण्याची बुद्धी दे- सुप्रिया सुळे


देवा...दुष्काळावर निधी खर्च करण्याची बुद्धी दे- सुप्रिया सुळे

कृषिकिंग, पुणे: ‘‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुष्काळ सोडून सर्व विषयांवर बोलतात. आकाशवाणी, दूरचित्रवाणी, वर्तमानपत्रात जाहिरातबाजी तर चुकतच नाही. कराच्या रूपाने वसूल झालेला जनतेचा पैसा स्वतःच्या जाहिरातींसाठी खर्च करण्यापेक्षा दुष्काळ निवारणार्थ केल्यास जनतेला दिलासा मिळेल. देवा त्यांना तशी बुद्धी दे,’’ असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.

पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील सासवड येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात राज्य सरकार व लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षमतेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने टाळनाद आंदोलन करण्यात आले होते. त्याचे नेतृत्व करताना सुळे बोलत होत्या. दुष्काळी मदत, कर्जमाफी, वीजबिल माफी, खड्डेमुक्त रस्ते अशा सर्वच आघाड्यांवर सरकार अपयशी आहे. असेही त्या म्हणाल्या आहेत.

राज्यात दुष्काळ असताना व इथले प्रश्न प्रलंबित असताना हे दुसऱ्या राज्यात मार्गदर्शन करायला गेलेत. राज्य सरकार कुंभकर्ण झालेय, असे म्हणताना खिशातल्या राजीनामावालेच ५० टक्के सरकारमध्ये भागीदार आहेत, हे ते कसे विसरतात. असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला आहे.संबंधित बातम्या