शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या यमरूपी सरकारचा निषेध; मनसेचा दंडुका मोर्चा
27 November 17:25

शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या यमरूपी सरकारचा निषेध; मनसेचा दंडुका मोर्चा


शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या यमरूपी सरकारचा निषेध; मनसेचा दंडुका मोर्चा

कृषिकिंग, औरंगाबाद: दुष्काळ नियोजनात आतापर्यंत अपयशी ठरलेल्या सत्ताधाऱ्यांना जागे करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी 'मनसे'च्या वतीने आज आज औरंगाबादमधील पैठणगेट येथून 'दंडुका मोर्चा' काढण्यात आला. त्यासाठी पैठणगेट येथे मराठवाड्यातून शेतकरी आणि मनसे कार्यकर्ते जमले होते.

पैठण गेट परिसरात जमलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मोर्चात दंडुका आणण्यास पोलिसांनी ऐनवेळी परवानगी नाकारली. त्यामुळे प्रतिनिधीक स्वरूपात दंडुके आणि उसाचे टिपरू घेऊन मोर्चेकरी सहभागी झाले होते. बैलगाडीसह मोर्चात शेतकरी सहभागी झाले आहेत. यावेळी 'शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या यमरूपी सरकारचा निषेध' असे बॅनर लावलेल्या हेल्याने आणि यमाची वेषभूषा साकारलेल्या मोर्चेकऱ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.संबंधित बातम्या