राज्यात दुष्काळ जाहीर; मात्र, अंमलबजावणीच्या नावाने बोंबाबोंब
27 November 15:29

राज्यात दुष्काळ जाहीर; मात्र, अंमलबजावणीच्या नावाने बोंबाबोंब


राज्यात दुष्काळ जाहीर; मात्र, अंमलबजावणीच्या नावाने बोंबाबोंब

कृषिकिंग, पुणे: सरकारने ३१ ऑक्टोबरला राज्यातील १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. मात्र, लोकप्रिय घोषणांच्या गदारोळात सरकारकडून दुष्काळी पट्ट्याकडे पुरते दुर्लक्ष होत असल्याचे समोर येत आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या कोणत्याही सवलतींची अंमलबजावणी कुठेही होताना दिसत नाहीये. त्यामुळे राज्यात दुष्काळ जाहीर झाला. मात्र, अंमलबजावणीच्या नावाने बोंबाबोंब असल्याचेच म्हणावे लागेल.

जमीन महसुलात सूट, कृषी कर्जाच्या वसुलीला स्थगिती, कृषी पंपांच्या वीजबिलात ३३ टक्के सूट यांसारख्या सवलती राज्यातील कोणत्याच भागात राबवल्या जात असल्याचे दिसत नाही. याच मुद्यावरून विरोधकांनीही सरकारला धारेवर धरले आहे.

राज्यातील २६ जिल्ह्यांमधील १५१ तालुक्यांमध्ये राज्य सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये १२१ तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा तर ३९ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.टॅग्स

संबंधित बातम्या