दुष्काळामुळे ग्रामीण भागातून लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतायेत
27 November 10:58

दुष्काळामुळे ग्रामीण भागातून लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतायेत


दुष्काळामुळे ग्रामीण भागातून लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतायेत

कृषिकिंग, पुणे: ग्रामीण भागात दुष्काळामुळे हाताला काम नसल्याने ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होत आहेत. अनेक तरुण आणि महिला कामाच्या शोधात गावं म्हाताऱ्या-कोताऱ्यांच्या भरवशावर सोडून रोजगारासाठी शहराकडे धाव घेत आहेत. काही ठिकाणी तर गावातल्या घरांना कुलप दिसत असून, गावच्या पारावर येणाऱ्या जाणाऱ्याकडे पाहणारी फक्त वृद्ध मंडळी दिसत आहे.

ग्रामीण भागात सध्या बिकट परिस्थिती आहे. हाताला काम नाही, प्यायला पाणी नाही. जनावरांना चारा नाही. खरीप हंगाम हातचा गेला तर रब्बीचीही आशा मावळली. अशा गंभीर दुष्काळी परिस्थितीत गावातील जवळपास ८० टक्के लोक स्थलांतर करत आहे. ऊसतोड आणि मुंबई-पुण्याला कामासाठी गेल्याने गावात शांतता पाहायला मिळत आहे.

एकीकडे घरं कुलूपबंद असताना ज्येष्ठ नागरिक पारावर दुष्काळाच्या भीषण परिस्थितीवर चर्चा करत आहेत. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत कमी-अधिक प्रमाणात हेच चित्र पाहायला मिळतंय. दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीमुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात होणारे स्थलांतर दुष्काळाची दाहकता सांगण्यास पुरेसे आहे. आता मायबाप सरकार या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कशी मदत करणार याकडेच सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.टॅग्स

संबंधित बातम्या