महाराष्ट्रातील दुष्काळ हा मानवनिर्मितचं- राजेंद्र सिंह
23 November 11:03

महाराष्ट्रातील दुष्काळ हा मानवनिर्मितचं- राजेंद्र सिंह


महाराष्ट्रातील दुष्काळ हा मानवनिर्मितचं- राजेंद्र सिंह

कृषिकिंग, ठाणे: राज्यात सरकारने जलयुक्त शिवारसारखी योजना राबवली असली, तरी दुष्काळ पडलेला आहे. योजना राबविताना ती सरकारी अधिकाऱ्यांनी नीटपणे न राबविल्याने राज्यात दुष्काळ पडला आहे. त्यामुळे या दुष्काळाला मानवनिर्मित दुष्काळच म्हणता येईल, अशा शब्दांत जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेवर टीका केली आहे.

राज्य सरकारला नोव्हेंबर महिन्यात दुष्काळ जाहीर करावा लागत असेल, तर ही चिंताजनक बाब आहे. आम्ही विविध ठिकाणी जलयुक्त शिवार योजना राबविली, असे आकडे सरकारकडून दिले जात आहेत. आकडे किती खरे किंवा खोटे, हे सांगता येणार नाही. मात्र, ही योजना सरकारी अधिकाऱ्यांनी व्यवस्थित राबवली नाही. असेही राजेंद्र सिंह म्हणाले आहे.टॅग्स

संबंधित बातम्या